ऍड. के. टी. पाटील, ऍड. चंद्रशेखर हुबळी यांचे निधन
प्रतिनिधी /बेळगाव
दोन सरकारी वकिलांचे बुधवारी निधन झाल्याने वकील वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी वकील म्हणून काम केलेले ऍड. के. टी. पाटील (वय 70) व ऍड. चंद्रशेखर एस. हुबळी (वय 73) यांचे आजाराने निधन झाले.
ऍड. के. टी. पाटील (मूळचे चिक्कदीनकोप्प, ता. खानापूर, सध्या. रा. लक्ष्मीनगर, गणेशपूर) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी मध्यंतरी विशेष सरकारी वकील म्हणून फास्टट्रक न्यायालयात काम केले होते.
ऍड. चंद्रशेखर एस. हुबळी (रा. पाईपलाईन रोड, तिसरा क्रॉस, रक्षक कॉलनी, विजयनगर, हिंडलगा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. ऍड. अश्विन हुबळी यांचे ते वडील होत. तसेच त्यांचा एक मुलगा परदेशात अभियंता आहे तर मुलगी परदेशामध्ये डॉक्टर आहे. एकाच दिवशी दोन निवृत्त सरकारी वकिलांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.