वार्ताहर/ औंध
औंध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन फरारी सराईत व कुख्यात आरोपींना सापळा रचून पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. धनाजी लालासो पाटोळे व एक मोक्कातील अल्पवयीन असे दोन आरोपी पकडण्यात यश मिळाले आहे. याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत माहिती अशी की,2014 आरोपी धनाजी लालासो पाटोळे रा.कोकराळे याने एका अल्पवयीन मुलीस एकटीला गाठून बलात्कार केला तर त्यानंतर पीडित मुलगी आठ महिन्याची गरोदर असताना तिला जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर,पोलीस उपनिरीक्षक शीतल सोमदे,पोलिस हवालदार प्रकाश यादव,पोलीस नाईक प्रशांत पाटील,पोलीस कॉन्टेबल महेश जाधव,जयवंत शिंदे,यांनी सचोटीने गुह्यातील आरोपीचा शोध घेऊन सापळा रचून अटक केली. तसेच मागील दीड वर्षांपूर्वी पुसेसावळी येथे गिरीजाशंकर हॉटेलमध्ये दरोडा पडला होता,त्या गुह्यातील 5 आरोपींना अटक करण्यात आले होते, व एक अल्पवयीन आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता.सदर आरोपीची माहिती मिळताच पथकाने त्याचा मोटरसायकलवरून पाठलाग करून त्यास शिताफीने ताब्यात घेतले.त्यास तपासकामी रिमांडहोम सातारा येथे पाठविण्यात आले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर,स्नेहल सोमदे यांचेसह पथकातील सर्वांचे जिल्हा पोलिस प्रमुख यांनी कौतुक केले आहे.