प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने 25 टन असे मोठय़ा क्षमतेचे दोन बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा काढल्या असून सदर प्रकल्प सोनसडय़ावर स्थापित केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. पालिकेला दैनंदिन कचरा प्रक्रिया करण्यासाठी सध्या समस्यांचा सामना करावा लागत असून त्यामुळे या मोठय़ा क्षमतेच्या प्रकल्पांची आवश्यकता होती. पालिका संचालकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येकी 25 टन क्षमतेचे दोन मिळून सुमारे 50 टन ओल्या कचऱयावर प्रक्रिया करणे पालिकेला शक्मय होणार आहे.
पालिका क्षेत्रातून सुमारे 40 टन ओला कचरा दैनंदिन गोळा होत असतो. हे दोन प्रकल्प मार्गी लागल्यास पालिकेची कचरा प्रक्रिया जाग्यावर पडू शकते. याखेरीज 5 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया लघुप्रकल्पाचे काम एसजीपीडीए मार्केटमध्ये सुरू आहे. तो उभा राहिल्यावर मार्केटमधील ओल्या कचऱयावर तेथेच प्रक्रिया करणे शक्मय होणार असल्याचे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी नजरेस आणून दिले आहे. 20 सप्टेंबरपर्यंत 25 टन क्षमतेचे बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून 22 रोजी त्या खोलल्या जाणार आहे. सदर बायोमिथेनेशन प्रकल्पात ओल्या कचऱयावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती केली जाणार आहे. बायोमिथेनेशन प्रकल्प उभारल्यानंतर 5 वर्षे तो चालविणे व देखभाल ठेवणे तसेच यादरम्यान पालिकेच्या कामगारांना प्रकल्पातील कचरा प्रक्रियासंदर्भात प्रशिक्षण पुरविणे अशा अटी निवेदेमध्ये समाविष्ट आहेत.