ढाबाचालकाला पोलीस अधिकाऱयाची अरेरावी : पोलीस आयुक्तांनी आवर घालण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेकायदा दारू विकणाऱयांवर अबकारी विभाग व पोलीस अधिकारी नेहमी लक्ष ठेवून असतात. त्यांच्यावर कारवाईही करीत असतात. एखाद्या व्यक्तीने स्वतःसाठी दारू आणि बियरचा किती साठा करावा? याचाही नियम आहे. मात्र, एका एसीपीने केवळ दोन बाटल्या बियरसाठी पंधरा हजार रुपये लाटल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
या घटनेने ढाबा व हॉटेलचालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. सुरुवातीला 50 हजार रुपये मागून शेवटी 15 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. कचेरी रोड, बेळगाव येथील एका वरि÷ पोलीस अधिकाऱयाच्या कार्यालयात हा व्यवहार झाला आहे. शुक्रवारी दिवसभर या कार्यालयात गर्दी होती. जमीनवाद मिटविण्यासाठी आणखी तिघा जणांना या महाभागाने आपल्या कार्यालयात डांबून ठेवले होते.
उपलब्ध माहितीनुसार हंदिगनूरजवळील एका ढाब्यावर बेकायदा दारूविक्री केली जाते, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांना मिळाली. स्वतः एसीपी दर्जाच्या एका अधिकाऱयाने ढाब्यावर बुधवारी तपासणी केली. तपासणीत बेकायदा दारूसाठा मिळाला नाही. त्यावेळी अधिकाऱयाने ढाब्यावरील फ्रिज उघडले. फ्रिजमध्ये दोन बियरच्या बाटल्या आढळल्या. त्या दोन बाटल्या पुढे करीत दारू विकत नाहीस तर बियरच्या बाटल्या कुठून आल्या? अशी विचारणा केली.
त्या दोन बियर बाटल्या आपण स्वतःसाठी ठेवल्याचे ढाबाचालकाने सांगितले. मात्र, या उत्तरावर एसीपींचे समाधान झाले नाही. आम्हाला माहिती मिळाली आहे, तू दारू विकतोसच. त्यामुळे उद्या येऊन भेट, असे सांगत ते निघून गेले. गुरुवारी ढाबाचालकाने एसीपींची भेट घेतली. त्यावेळी दोन बाटल्या बियरचे प्रकरण मिटवायचे असेल तर 50 हजार रुपये दे, अशी मागणी केली. त्यावर ढाबाचालकाने माझ्या ढाब्यावर फक्त जेवण बनविले जाते. मी दारू विकत नाही. मग 50 हजार कशासाठी द्यायचे? असा प्रश्न केला. हवे तर माझ्यावर एफआयआर दाखल करा, असेही ढाबाचालकाने पोलीस अधिकाऱयाला सुनावले.
तरीही तो अधिकारी बधला नाही. तुम्ही उद्या या, असे सांगून त्यांना घरी पाठविण्यात आले. शुक्रवारी दिवसभर पुन्हा मांडवली झाली. शेवटी 50 हजाराचे प्रकरण 15 हजारावर मिटविले. सध्या बेळगाव शहरात ठाण मांडून बसलेले अनेक अधिकारी अक्षरशः लुटमारीवर उतरले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी अशा अधिकाऱयांना आवर घालण्याची मागणी होत आहे.