वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बाजारांमधील होत असणारी उलाथापालथी आणि त्याच काळात देशातील सर्वात धनाढय़ांच्या संपत्तीत घट होत असल्याचे चित्र आहे. देशासह जगातील श्रीम्ंाताच्या यादीत स्थान पटकावरणारे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची संपत्ती दोन महिन्यात जवळपास 28 टक्क्मयांनी घटली आहे.
कोरोनाची वाढती महामारी आणि त्यांच्याशी संबंधीत असणारा शेअर बाजाराचा कल याचा प्रभाव श्रीमंताच्या संपत्तीवर होत असतो. शेअर बाजारातील घसरणीसह 31 मार्च रोजी अंबानी यांची संपत्तीचे मूल्य 48 अब्ज डॉलरवर राहिले आहे. जगातील श्रीमंताच्या यादीत रिलायन्सचे अंबानी आठव्या स्थानावर असल्याचे परामर्श संस्था हुरुन यांनी सांगितले आहे. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत बाजारातील दरानुसार त्यांच्या संपत्तीत 19 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे. तर अदानी समूहाचे गौतम अदानी यांची संपत्ती 6 अब्ज डॉलर म्हणजे 37 टक्क्मयांनी घसरली आहे. तर एचसीएल टेकचे प्रमुख शिव नाडर यांची संपत्ती जवळपास 5 अब्ज डॉलर म्हणजे 26 टक्क्मयांनी आणि कोटक बँकेचे उदय कोटक यांची संपत्ती 28 टक्क्मयांनी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.