नवी दिल्ली
वनप्लस आपल्या फ्लॅगशिप 9 या आवृत्तीच्या स्मार्टफोनचे सादरीकरण करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कंपनी येत्या 23 मार्च रोजी सदरचे मॉडेल जागतिक पातळीवर सादर करण्याचे संकेत आहेत. वनप्लस 9 या मॉडेलला जवळपास दोन वर्षांची वॉरंटी देण्यात येणार असून यामध्ये ‘वनप्लस 9 आणि 9 प्रो ’ मॉडेल सादर होणार असून यांची किमत अंदाजे 45 ते 655 हजार रुपयांपर्यंत राहणार असल्याची माहिती आहे.
साधारणपणे एखादी कंपनी 1 वर्षाची वॉरंटी बाजारात देतात. परंतु वनप्लस 9 या स्मार्टफोनला खरेदीनंतर दोन वर्षांची वॉरंटी देणार असल्याचे कंपनीचे सीईओ पीट लाउ यांनी म्हटले आहे. सध्या फक्त चिनी ग्राहकांना ही सुविधा मिळणार असून जगभरातील अन्य ग्राहकांना त्याच्यानंतर ही सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे.
वनप्लस 9 मधील विशेष सुविधा…
वनप्लस 9 5जी मध्ये 6.5 इंच एफएचडी/एमोलेड स्क्रीन
वनप्लस 9 प्रो 5 जी मध्ये 6.67 इंच एमोलेड क्यूएचडी स्क्रीन
वनप्लस 9 आणि 9 प्रो दोन्ही उपकरणास स्नॅपड्रगन 888 प्रोसेसर
12 जीबीपर्यंत एलपीडीडीआर 5 रॅम आणि 256 जीबी स्टोरेज
16 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा