सचिन गुदगे ; हाय मास्क पोलचा लोकार्पण सोहळा उत्साहात
वार्ताहर / मायणी
आम्ही मागील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विकासाचा अजेंडा जनतेसमोर ठेवला होता. त्यातील 90 टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत आहेत. चाळीस वर्षात विरोधकांना जमले नाही ते आम्ही दोन वर्षात विकास क्रांती खेचून आणली याबद्दल आम्ही समाधानी असल्याचे प्रतिपादन सरपंच सचिन गुदगे यांनी केले.
मायणी (ता.खटाव) येथील श्रीराम कॉलनी येथे मरडवाक रस्त्याला जोडून नव्यानेच ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या हाय मास्क पोलचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडाला. त्याचे उद्घाटन युवा नेते सरपंच सचिन गुदगे यांच्या हस्ते व माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
डॉक्टर दिलीप येळगावकर म्हणाले, स्वच्छ आणि सुंदर मायनी हरित मायणी हे स्वप्न घेऊन आम्ही चाललो आहोत. ग्रामपंचायतीने वाढवलेला विकासाचा रेशो खरोखरच अभिमानास्पद आहे. मी वैयक्तिक सचिन गुदगे व सर्व सदस्य सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो. येत्या चार महिन्यात बायपास रस्त्याचे काम व टेंभू योजनेचे काम पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मात्र विरोधक नव्या सुधारणांना खोका घालीत आहे हे समजत नाही.
या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य दत्ता काबुगडे, अभिजीत काबुगडे, उस्मान इनामदार, राजू कचरे, प्रकाश कवडे गुरुजी, विजय देशमुख, लिपारे कांबळे, शिवदास माळी, प्रमोद महामुनी, सूरज खांडेकर, मधुकर कचरे, तसेच प्रभाग 2 मधील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी राजू कचरे यांनी आभार मानले.