गोडोली / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कोंडवे येथील अस्तित्वात नसलेली जमीन संतोष घाडगे याला माजी सरपंच शरद बोडके याने विक्री केली होती. याप्रकरणी दि.२२ जानेवारी १९ रोजी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा पासून पोलिसांना सतत गुंगारा देणारा शरद बोडके हा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत प्रचार करत फिरत असल्याची खबर गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना मिळाली.
कोंडवे येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचारात तो सक्रिय झाला होता. हनुमान मंदिराच्या चौकातील कट्ट्यावर प्रचार करत असताना पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी ताब्यात घेतला.यावेळी कॉ.अभय साबळे, अविनाश चव्हाण, गणेश घाडगे, गणेश भोंग, विशाल धुमाळ ही गुन्हे प्रकटीकरण टीम यात सहभागी झाली होती.