अन्यथा तुरुंगवारी करण्याची येते वेळ
भारतात पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय कुणीच दुसरा विवाह करू शकत नाही. जगातील प्रत्येक देशात विवाहासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे कायदे आहेत. परंतु जगात एक असा देश आहे, जेथे प्रत्येक पुरुषाने दोन विवाह करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या पुरुषाने दोन विवाह करण्यास नकार दिला तर त्याला स्वतःचे आयुष्य तुरुंगात घालवावे लागते.
आफ्रिका खंडातील एका देशात हा तुघलकी कायदा आहे. दोन विवाह करण्यास नकार देणाऱया पुरुषाला तेथे कठोरात कठोर शिक्षा करण्यात येते. इरीट्रिया असे या देशाचे नाव असून तेथे पुरुषाला आनंदाने किंवा दुःखी मनाने दोन विवाह करावे लागतात.
या देशात महिलांमुळे हा अनोखा कायदा लागू करण्यात आला आहे. इरीट्रियामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. इरीट्रियाचे इथियोपियासोबत युद्ध सुरू असल्याने तेथे महिलांची संख्या अधिक आहे.
सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या देशात महिलांसाठी देखील कठोर कायदे आहेत. येथील महिला पुरुषांना दोन विवाह करण्यापासून रोखू शकत नाहीत. जर त्यांनी विवाहात अडथळे आणल्यास त्यांनाही तुरुंगात डांबण्यात येते.