प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील दौलतनगर येथील शिवशक्ती नवरात्र दुर्गोत्सव मंडळात दुर्गामातेची प्रतिष्ठापणा भक्तीपूर्ण वातावरणात झाली. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आल्यानंतर त्यांच्या हस्ते महाआरतीही झाली. यावेळी मंडळाने यावर्षी कोरोनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिरासारखे उपक्रम आयोजित करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी केले.
यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सतीश सुर्यवंशी, शाहूपुरी ग्रामविकास आघाडीचे भारत भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, सुहास वहाळकर, शोभा केंडे, निलम देशमुख, माधवी शेटे, विजय गार्डे, नितीन तरडे, राजेंद्र केंडे, प्रा. डॉ. सुजीत जाधव, बाळासाहेब निकम, गणेश वाघमारे, सतीश इंदलकर यांची उपस्थिती होती.
1995 पासून कार्यरत असलेल्या शिवशक्ती नवरात्र दुर्गा उत्सव मंडळाचे उत्सवाचे हे सलग 26 वे वर्ष आहे. या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक महिलांचे उत्तम संघटन साधले जात असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे परिसरात सामाजिक सलोखा राखण्यास मदतच होत आहे. यावर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन दुर्गोत्सव साजरा होत असून परिसरात भक्तीपूर्ण, मांगल्यमय वातावरण निर्माण झाले आहे.
सतीश मर्ढेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, नागरिक जीवन फरांदे, संतोष राजे, किरण राजे, संतोष किर्दत, सत्यवान किर्दत, चंद्रकांत फडतरे, आशिष खरात, शिवाजी जाधव, यशवंत पाटणे, विनायक थोरात, अमोल गहिने, शिवाजी सुर्यवंशी, जगन्नाथ पवार, चंद्रकांत जगताप, राजेंद्र औताडे, सुनिल कणकणवाडीकर, संभाजी कदम, रामदास कदम, समीर सुर्यवंशी, क्षितिज आवाडे, मोहन शिंदे, प्रशांत चौरे, विशाल सुर्यवंशी, सोहम शिंदे, अभिजित सुर्यवंशी, सौरभ सुर्यवंशी, यश आवाडे, प्रथमेश जाधव, ऋषिकेश खरात, आकाश कदम, योगेश फडतरे, ऋतुराज करंजे, जयकर खुडे, अथर्व कुंभार, मनोज चौरे उपस्थित होते.