बांगलादेशवर 10 गडय़ांनी एकतर्फी विजय
वृत्तसंस्था/ रायपूर
येथे सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी-20 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका लेजेंड्स संघाने बांगलादेश लेजेंड्सचा 10 गडय़ांनी एकतर्फी धुव्वा उडवित उपांत्य फेरी गाठली.
द.आफ्रिकेचे सलामीवीर अँड्रय़ू पुटिक (54 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह नाबाद 82), मॉर्न व्हान वीक (62 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 69) या सलामीवीरांनी नाबाद अर्धशतके झळकावत 19.2 षटकांतच 161 धावांचे उद्दिष्ट पार केले. या विजयामुळे दक्षिण आफ्रिका संघाने 16 गुणांसह तिसरे स्थान मिळविले. भारत (20) व लंका (20) पहिल्या दोन स्थानावर आहेत. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर बांगलादेश लेजेंड्सने बऱयापैकी सुधारणा केल्याचे दिसून येत होते. पण द.आफ्रिका लेजेंड्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने त्यांचा डाव कोसळला. मोहम्मद रफीकच्या नेतृत्वाखालील या संघाला 20 षटकांत 9 बाद 160 धावांपर्यंत मजल मारता आली. द.आफ्रिका लेजेंड्सचा ऑफस्पिनर थांडी शबालाला व वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. नझिमुद्दिनने चांगली सुरुवात करून देताना 33 चेंडूत 32 धावा केल्या. त्यात 5 चौकार, एका षटकाराचा समावेश होता तर आफताब अहमद (3 षटकार, एक चौकारासह 39) व हन्नान सरकार (2 चौकार, एक षटकारासह 36) यांनीही बांगलादेशतर्फे चांगले योगदान दिले. सरकारला गार्नेट प्रुगरने 130 या धावसंख्येवर बाद केल्यानंतर बांगलादेशने 6 फलंदाज केवळ 30 धावांत गमविले.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश लेजेंड्स 20 षटकांत 9 बाद 160 (नझिमुद्दिन 32, आफताब अहमद 39, हन्नान सरकार 36, एन्टिनी 2-26, शबालाला 2-33), द.आफ्रिका लेजेंड्स 19.2 षटकांत बिनबाद 161 (पुटिक नाबाद 82, व्हान वीक नाबाद 69).