वृत्तसंस्था / कराची
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ 14 वर्षांच्या खंडानंतर पाकिस्तान दौऱयावर येणार असून या दौऱयात हा संघ पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी व तीन टी-20 सामने खेळणार आहे. येत्या जानेवारीत हा दौरा सुरू होणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने बुधवारी सांगितले.
या मालिकेतील कसोटी सामने कराची व रावळपिंडी येथे तर तीनही टी-20 सामने लाहोरमध्ये खेळविले जाणार आहेत. ‘द.आफ्रिका संघ 16 जानेवारीस पाकमध्ये दाखल होईल आणि कराचीतील नॅशनल स्टेडियमवर 26-30 जानेवारी या कालावधीत पहिली कसोटी खेळेल. त्यानंतर दुसऱया कसोटीसाठी हा संघ रावळपिंडीत दाखल होईल. ही कसोटी 4-8 फेबुवारी या कालावधीत होईल. पाकिस्तान क्रिकेटचे मुख्यालय असलेल्या गद्दाफी स्टेडियमवर द.आफ्रिकेचे तीनही टी-20 सामने खेळविण्यात येतील. हे सामने 11, 13, 14 फेब्रुवारी रोजी खेळविले जातील,’ असे पीसीबीने सांगितले. पाहुण्या संघाचे कराचीत आगमन झाल्यावर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल. याच अवधीत त्यांचा सरावही सुरू राहील आणि त्यांना अंतरसंघात सराव सामनेही खेळता येतील, असेही पीसीबीने स्पष्ट पेले.
यापूर्वी 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकचा शेवटचा दौरा केला होता. त्या दौऱयात कराचीतील कसोटी 160 धावांनी जिंकून द.आफ्रिकेने मालिका 1-0 अशी जिंकली होती. त्यानंतर या दोन संघांच्या 2010 व 2013 मधील मालिका संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविण्यात आल्या होत्या. 1995 पासून या दोन संघांत आतापर्यंत 11 कसोटी मालिका खेळल्या गेल्या असून त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने सात मालिका जिंकल्या तर पाकने 2003 मधील एकमेव मालिका जिंकली होती. आयसीसी कसोटी मानांकनात सध्या दक्षिण आफ्रिका संघ सहाव्या तर पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे. ‘द.आफ्रिकेने पाक दौरा निश्चित केल्याने मी खुश असून मायदेशातील कसोटीत संघाचे नेतृत्व करण्यास मीही उत्सुक झालो आहे. याच ठिकाणी आम्ही अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगचे जेतेपद पहिल्यांदाच मिळविले होते,’ असे पाक संघाचा कर्णधार बाबर आझम म्हणाला. ‘पुढील वर्षाचे क्रिकेट वेळापत्रक पाहिल्यावर आमचे अधिक सामने आमच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या संघांविरुद्धच असल्याचे दिसून येते. यामुळे आम्हाला तिन्ही प्रकारात मानांकन सुधारण्याची संधी मिळणार आहे,’ असेही तो म्हणाला.
पाकिस्तानमध्ये टी-20 मालिकेत हे दोन संघ बऱयाच कालावधीनंतर प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
याआधीच्या मालिका संयुक्त अरब अमिरात या त्रयस्थ ठिकाणी झाल्या होत्या आणि त्या दोन्ही मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकल्या होत्या. ‘अनेक देशांचे संघ पाकिस्तानमध्ये पुन्हा येत असून पाकच्या क्रिकेटप्रेमीसाठी ही आनंददायक बाब आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका त्यात सामील होत आहे, याचा आम्हालाही आनंद होत आहे,’ असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्sा क्रिकेट संचालक ग्रीम स्मिथ म्हणाले. ‘काही आठवडय़ांपूर्वी सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आमचे पथक पाकमध्ये आले होते. त्यावेळी पाकने दाखवलेले आदरातिथ्य आणि पारदर्शकता याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सुरक्षा पथकाने पाकमध्ये खेळणे सुरक्षित असल्याचा अहवाल दिल्यानंतर आम्ही येथे दाखल होत आहोत,’ असेही स्मिथ म्हणाले.
पाकिस्तान क्रिकेट आणि चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असून द.आफ्रिका संघानंतर न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडीज संघही पाक दौऱयावर येणार आहेत. याशिवाय पाक संघ द.आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, अफगाणिस्तान व वेस्ट इंडीज दौऱयावरही जाणार आहे. या मालिकेने पाकमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णत्वाने सुरू होईल, असे पीसीबीचे संचालक झाकिर खान म्हणाले.
होत असल्याचे सर्वांना दिसून येईल. याची सुरुवात 2015 पासून झाली होती, असे पीसीबीचे संचालक झाकिर खान म्हणाले.