6 भाषांमध्ये ओटीटीवर येणार चित्रपट
मार्व्हल स्टुडियोजचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द इटर्नल्स’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त जाहीर झाला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 12 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार आहे. मार्व्हल स्टुडियोने सोशल मीडियावर ‘द इटर्नल्स’चे पोस्टर शेअर करत याची माहिती दिली आहे.
ऑस्करविजेते च्लोए झाओ हे या चित्रपटाचे सह-पटकथालेखक आणि दिग्दर्शक आहेत. द इटर्नल्सची कथा 7000 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून पृथ्वीवर गुप्त स्वरुपात जीवन व्यतित करणाऱया अमर प्राण्यांवर आधारित आहे. शूत्र समोर आल्यावर द इटर्नल्स स्वतःच्या ग्रहाला वाचविण्यासाठी एकजूट होत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. चित्रपटात जेमा चान ‘सरसी’ आणि रिचर्ड मॅडेन ‘इक्कारिस’च्या भूमिकेत दिसून येणार आहे. याचबरोबर चित्रपटात कुमैल ननजियानी ‘किंगो’च्या भूमिकेत अणि बुद्धिमान आविष्कारक आणि मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला समलैंगिक हिरो ‘फास्टोस’च्या भूमिकेत ब्रायन टायरी हेन्री दिसून येणार आहे. भारतात हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळी आणि इंग्रजीतही प्रदर्शित केला जाणार आहे.