प्रतिनिधी /मडगाव
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांची बदली नवी दिल्लीत करण्यात आली आहे. या संबंधीचा आदेश नवी दिल्लीहून काल बुधवारी गोव्यात आला. जुलै 2020 साली त्यांची गोव्यात बदली झाली होती. कोणताही मोठा गुन्हा घडला की सांघीकपणे काम करुन त्या गुन्ह्याचा तपास लावण्याचे तंत्र त्यांनी राबविले होते आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत दक्षिण गोव्यातील बहुतेक सर्व मोठय़ा गुन्ह्यांचा तपास लागला होता. नवी दिल्लीत त्यांची बदली युवा व्यवहार खात्यात करण्यात आलेली असून तेथे ते उपसचिव या नात्याने काम पाहणार आहेत.