माधुरी दीक्षितची वेबसीरिज ‘द फेम गेम’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यासंबंधीची माहिती माधुरीनेच सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत दिली आहे. बेजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली यांच्या दिग्दर्शनाच्या अंतर्गत तयार ही सीरिज 25 फेबुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
माधुरीने सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करत ‘स्टारडम एका क्षणात गायब होऊ शकते असे ऐकले होते, परंतु एक सुपरस्टारच गायब होईल हे कधीच ऐकले नव्हते’ असे नमूद पेले आहे. “स्वतःची ‘परफेक्ट’ लाइफची कहाणी सांगण्यासाठी येतेय अनामिका आनंद’ असे तिने लिहिले आहे.
द फेम गेमची कहाणी एक फिक्शन असून ती हिंदी चित्रपटसृष्टीतीला प्रसिद्ध अभिनेत्री अनामिका आनंदच्या जीवनावर आधारित आहे.या सीरिजची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनचे डिजिटल व्हेंचर धर्माटिक एंटरटेनमेंटने केली आहे. यात माधुरीसह संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे आणि मुस्कान जाफरी दिसून येणार आहेत.