मदर ऑफ ऑल स्कॅम्स
अभिषेक बच्चन स्टारर चित्रपट द बिग बुलचा टीजर प्रदर्शित झाला आहे. हा टीजर अत्यंत रंजक असून चित्रपटाचे निर्माते अजय देवगण यांनी टीजर प्रदर्शित करत चित्रपटाच्या ट्रेलर 19 मार्च रोजी डिस्ने व्हीआयपी आणि डिस्ने प्लस हॉटस्टार मल्टीफ्लेक्सवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.
छोटय़ा घरातील माणसाची मोठी गोष्ट
‘छोटे घरों में पैदा होने वालों को अक्सर बेड सपने देखने से मना कर देती हे दुनिया…इसलिय उसने अपनी दुनिया खडी कर दी.. द बिग बुल…मदर ऑफ ऑल स्कॅम्स’ या अजय देवगणच्या दमदार आवाजातील व्हाइŸस ओवरद्वारे टीजरची सुरुवात होते. छोटय़ा घरांमधील एक व्यक्ती रियल इस्टेटमधील दिग्गज होत असल्याचे यात दाखविण्यात आले आहे.
चित्रपटात अभिषेकसह इलियाना डीक्रूज दिसून येणार आहे. हा एक क्राइम ड्रामा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कूकी गुलाटी यांनी केले आहे. द बिग बुल 1992 मध्ये झालेल्या भारतीय स्टॉक मार्केटच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा घोटाळय़ावर आधारित असल्याचे समजते. चित्रपटात अभिषेक बच्चन स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या भूमिकेत दिसून येणार आहे.