प्रसिद्ध दिग्दर्शिका रेवती यांचा चित्रपट
अभिनेत्री काजोल यापूर्वी ‘त्रिभंगा’ या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. काजोल आता नव्या चित्रपटातून झळकणार असल्याचे वृत्त आहे. या चित्रपटाद्वारे ती दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रेवती यांच्यासोबत काम करणार आहे. रेवती आणि काजोल या दोघीही भारतीय चित्रपटसृष्टीत दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही दिग्गज अभिनेत्री आता ‘द लास्ट हुर्रे’साठी एकत्र येणार आहेत.
या चित्रपटाची पटकथा एका सत्यकथेवर आधारित आहे. याची कहाणी सुजाता नावाच्या एका महिलेभोवती फिरणारी आहे. या महिलेने अत्यंत आव्हानात्मक स्थितींचा हसत-खेळत सामना केला होता. चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सुरू आहे. लवकरच याचे चित्रिकरण सुरू होईल. हा चित्रपटाची निर्मिती सूरज सिंह अणि श्रद्धा अग्रवाल मिळून करत आहेत. ब्लाइव्ह प्रॉडक्शन आणि टेक 23 स्टुडिओ प्रॉडक्शनच्या बॅनर अतंर्गत निर्माण होणाऱया या चित्रपटाची पटकथा समीर अरोरा यांनी लिहिली आहे.