वेगवेगळय़ा राज्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थ सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्ध असलेली स्टार्टअप् कंपनी ‘द स्टेट प्लेट’ने घवघवीत यश संपादन केले आहे. केवळ अकरा महिन्यांपूर्वी मुस्कान संचेती आणि राघव झंवर या दोन तरुणांनी ही स्टार्टअप् कंपनी स्थापन केली. गेल्या अकरा महिन्यात या कंपनीने 500 उत्पादने लाँच केली आहेत. आतापर्यंत त्यांनी 21 हजार ऑर्डरी पोहोचविल्या आहेत. गेल्या वषी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पापड बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. या पापडांचे ऑनलाईन मार्केटिंग यशस्वी करून दाखविले. 15 किलोमीटर दूर असणाऱया घरातही ते खाद्यपदार्थ पोहोचवितात.
सर्व ग्राहकांना उत्तम दर्जाची स्थानिक खाद्य उत्पादने हवी असतात. तथापि, हे पदार्थ अत्यंत कमी ठिकाणी तयार होतात. त्यामुळे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा खर्च मोठा असतो. कित्येकदा पदार्थाच्या किमतीपेक्षा वाहतुकीचा खर्चच अधिक होतो. या अडचणी ओळखून त्यांनी स्वस्तात स्थानिक पदार्थ घरपोच करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणून दाखविली आहे. त्यांच्या लोकप्रिय ब्रँड्समध्ये पुण्यातील चितळे बंधूंची बाकरवडी, सोलापूरची प्रसिद्ध शेंगा चटणी, गुजरातमधील मिठाई इत्यादी पदार्थांचा समावेश आहे. उत्पादन कर्त्यांकडून हे पदार्थ घेऊन कितीही दूरवरच्या ग्राहकाला किफायतशीर दरात पोहोचविणे हे त्यांचे वैशिष्टय़ आहे.