वृत्तसंस्था/ मुंबई
इंग्लंडमध्ये होणाऱया द हंड्रेड या स्पर्धेत भारताच्या ठरावीक वयोगटातील क्रिकेटपटूंना खेळण्याची परवानगी देण्याबाबत बीसीसीआयने विचार चालविला आहे.
सध्या राष्ट्रीय संघात नसलेल्या तसेच ज्यांना अजून खेळण्याची संधी न मिळालेल्या 23 वर्षाखालील खेळाडूंना संधी देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. मात्र सध्या हा केवळ अंदाज आहे. यासंदर्भात दोन्ही देशांच्या मंडळांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. द हंड्रेडची पहिली आवृत्ती या उन्हाळय़ात होणार आहे. मात्र वेळ कमी असल्याने तसेच कोव्हिडने जगभर माजविलेला हाहाकार पाहता दोन्ही मंडळे या वर्षी ही स्पर्धा आयोजित करणार नाहीत, अशीच चिन्हे आहेत.