ऑनलाईन टीम / मुंबई :
टिव्ही अभिनेता, मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तो 44 वर्षांचा होता. समीरने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अजून समजले नसून पोलीस शोध घेत आहेत.
समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. ये रिश्ते है प्यार के, सास भी कभी बहु थी, कहानी घर घर की, लेफ्ट राइट लेफ्ट यांसारख्या लोकप्रिय मालिकामधील कामांमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. दोन दिवसांपूर्वीच त्याने ही आत्महत्या केली असून, त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती कळत आहे.
समीर मुंबईतील मालाड येथील घरी एकटाच राहात होता. पत्नीचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यावेळी काहीतरी चुकीचं घडलं असल्याची शंका तिला आली. शिवाय समीर काही दिवस कोणालाच दिसलाही नाही. त्याचवेळी चौकीदाराला मृतदेहाचा वास येण्यास सुरु होताच त्याने पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत घराचे दार उघडले असता समीरचा मृतदेहच पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सध्याच्या घडीला या घटनेने अनेकांना हादला बसला असून, समीरच्या आत्महत्येचं मूळ कारण मात्र अस्पष्टच आहे.