प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. आजची धक्कादायक बाब म्हणजे विनाकारण फिरणारे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाळवा तालुका आरोग्य विभागा मार्फ़त ही टेस्ट करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह आढळलेले हे आठजण शहरासह वाळवा तालुक्यातील रेठरे धरण, शिवपुरी सांगली, येथील आहेत.