ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. दिल्लीत देखील चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एका कोरोना संक्रमित जवानाने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जवानाला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 12 मे रोजी या जवानाने पहाटे चारच्या सुमारास रुग्णालयातील वॉर्डच्या मागील झाडावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने लटकून आत्महत्या केली.
दरम्यान, या जवानाला फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. लष्कराच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. जवानाचा कोरोना चाचणीचा अहवाल पाठवला असता, तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या जवानाला 5 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलिस उपायुक्त दीपक पुरोहित म्हणाले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो असता या जवानांची बॉडी रुग्णालयातील वॉर्डच्या मागील झाडाला नायलॉन च्या दोरीने लटकलेले मिळाले. मात्र घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट नाही मिळाली. पोलिस म्हणाले, मृत जवानाचे कुटुंब राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात राहते. त्यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.