ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
दिल्ली पोलीसांनकडून काल दि. 15 सप्टेंबर रोजी 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी घेतलेले प्रशिक्षणाचा विचार करता त्यांच्याकडून संवेदनशिल माहिती उघड होणे अपेक्षित होतं. याच पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक घटकांचा उलघडा आता समोर येऊ लागला आहे. अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांनचे 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचे नियोजन होते. मात्र यापुर्वीच त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने त्यांचा संपुर्ण कट फसला आहे. याबरोबरच चौकशीत त्यांच्याकडून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र एटीएसने दिलेल्या माहिती नुसार 6 दहशतवाद्यांपैकी एक असणारा जान मोहम्मद हा मुंबईचा रहिवाशी आहे. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता मात्र नोकरी गेल्याने त्याला अर्थिक चणचण भासत होती. यानंतर त्याने कर्जावर टॅक्सी घेतली मात्र कर्ज परतफेड न केल्याने ती बँकेने जप्त केली. पुन्हा एक दोन चाकी वाहऩ घेतले होते. ते ही कर्जावरच घेतले होते. कदाचीत त्यासाठीच त्याला पैशाची गरज भासल्याने त्याने हे कृत्य केले असावे असे तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच एका इंग्रजी वर्तमान पत्राने दिलेल्या माहितीनुसार देशात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आणलेलं दीड किलो आरडीएक्स देखील पोलिसांनी दहशतवाद्यांक़डून हस्तगत केलं आहे.