ऑनलाईन टीम / बीड :
बीडच्या आष्टी तालुक्यातील सांगावी पाटण येथे कोरोनाबाधित आढळलेल्या 65 वर्षीय महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. कालच तिच्यासह सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिला मूळची नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होती. ती मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकांकडे आली होती. बीडमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील हा पहिलाच बळी ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 वर पोहचली आहे. आता जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत. दरम्यान, मुंबई-पुण्याहून आलेल्यांनी तपासणीसाठी पुढे येऊन संसर्ग टाळण्याचे आवाहन बीडचे जिल्हा शल्य अशोक थोरात यांनी केले आहे.