ऑनलाईन टीम / जयपूर :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. संपूर्ण देशात खबरदारी म्हणून लॉक डाऊन देखील जारी करण्यात आले आहे. मात्र, लोकांना याची जाणीव होण्यास वेळ लागत आहे. याचा प्रत्यय देणारी घटना राजस्थान मध्ये घडली आहे. राजस्थान मधील एका माणसामुळे संपूर्ण गावावर कोरोनाची टांगती तलवार उभी राहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान मधील दौसा जिल्ह्यातील एका गावातील एका व्यक्तीने मुलगा झाला या खुशीत संपूर्ण गावात लाडू वाटले. मात्र हाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा व्यक्ती छारडा येथे लॅब टेक्नीशिअन असून याला दौसा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ड्युटी वर पाठवण्यात आले होते. त्यावेळी त्याची गर्भवती पत्नी सरकारी दवाखान्यात भरती होती. तिला 15 एप्रिलला मुलगा झाला त्यानंतर हा व्यक्तीने 21 एप्रिल रोजी स्वतः ला कामातून सूट मिळवत पुन्हा छारडा येथे आपली ड्युटी लावून घेतली. व आपल्याला मुलगा झाला या आनंदात संपर्ण गावात लाडू वाटले.
त्यावेळी त्याचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सध्या हॉस्पिटल मध्ये कार्यरत असलेल्यांची कोरोना टेस्ट घेतली जात आहे त्यामध्ये या व्यक्तीचे रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावात गोंधळ उडाला असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.