प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावू लागला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 116 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 116 पैकी 82 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 34 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत.
शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक असून जिल्ह्यात 116 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील शनिवारीपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,733 वर जाऊन पोहचली आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 82 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 34 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.