ऑनलाईन टीम / नोएडा :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. सरकारने लोकांना घरी थांबण्याचे आवाहन ही केले आहे. त्यातच उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना समोर आली आहे.
नोएडामध्ये लुडो खेळत असताना एका व्यक्तीला खोकला आल्याने त्याच्यात मित्राने कोरोना पसरवतोय असे म्हणत त्याच्यावर गोळी झाडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जरचार मधील परिसरात चार मित्र लुडो खेळत होते. यातील एक म्हणजेच प्रशांतला खेळत असताना खोकला लागला. त्यावेळी त्याच्या बरोबर खेळत असलेले गल्लू, जय आणि प्रवेश यांच्यासोबत प्रशांत चे भांडण झाले. यावेळी प्रशांत खोकून कोरोना पसरवत आहे असे इतरांचे म्हणणे होते. मग हा वाद वाढत गेला आणि संतापलेल्या गल्लुने प्रशांत वर गोळी झाडली.
यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नोएडा पोलिसांनी लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, असे सांगितले आहे.