ऑनलाईन टीम / बिहार :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील व्यवहार देखील ठप्प आहेत. त्यातच बिहार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यात एका न्हाव्याने लॉक डाऊन मध्ये केस कापण्यास आणि दाढी करण्यास नकार दिल्याने त्या न्हाव्याची हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव दिनेश ठाकूर आहे. त्याची पत्नी मुसा देवी हीने अमरपुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
मुसा देवी यांनी आपल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे की, लॉक डाऊन मध्ये काही गावकऱ्यांनी त्यांच्या वर केस व दाडी करण्याचे दबाव टाकत होते. शनिवारी ठाकूर यांना यासाठी बोलावणे आले. तर दुसऱ्य दिवशी ठाकूर यांचा मृतदेह गावाच्या तलावात सापडला. त्यांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्या होत्या.
अमरपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी कुमार सनी यांनी सांगितले की, या प्रकरणात आत्ता पर्यंत आम्ही तीन आरोपींना पकडले आहे. मात्र, मुख्य आरोपी अजून ही फरार आहे. लवकरच त्याला ही पकडण्यात येईल. या घटनेची अधिक माहिती ग्रामस्थांकडून घेतली जात आहे.