ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर दोन जणांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महिला आणि पुरुषाने न्यायालयाच्या गेट क्रमांक डी मधून आता घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, योग्य ओळखपत्राशिवाय आत जाण्यास सुरक्षा कर्मचाऱयांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर, आत प्रवेश न मिळाल्यानं संतापलेल्या या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटजवळ स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे या दोघांचेही जीव वाचले आहेत. मात्र यामध्ये या दोघांची प्रकृती गंभीर झाल्याने, या दोघांना पोलिसांनी गाडीतून तात्काळ राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक ज्वलनशील पदार्थाची बाटलीही सापडली असून याच बाटलीतून आणलेला पदार्थ अंगावर ओतून घेत या दोघांनी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला.