ऑनलाईन टीम / मेरठ :
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयात 2500 रुपयात लोकांना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह मिळतील, असा व्हिडियो व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर न्यू मेरठ हॉस्पिटलचे लायसन्स रद्द करण्यात आल्यानंतर ही हे हॉस्पिटल अजून सील केले गेले नाही. शनिवारी डीएम ने हे आदेश दिले होते.
याबाबत अधिक माहिती देताना सीएमओनीं सांगितले की, या हॉस्पिटलला सील लावण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाला दिली आहे. आरोग्य विभागाकडून रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.
मेरठमध्ये शनिवारी 2 मिनिट 33 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगत आहे की, अडीच हजार रुपयांमध्ये खोटे कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट करून मिळतील आणि हे एक आठवड्यांसाठी वैध्य असतील. तसेच हे तुम्ही कोठेही घेऊन जाऊ शकाल. कोणालाही दाखवू शकाल. तसेच या रिपोर्टवर प्यारेलाल शर्मा हॉस्पिटल अशा नावाचा शिक्का असेल. तसेच जर तुम्ही बाहेर टेस्ट केली तर कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतात आणि तुम्हाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन व्हावे लागेल. पण हे रिपोर्ट निगेटिव्हच येतील.
इन्स्पेक्टर प्रशांत कपिल यांनी सांगितले की, या संदर्भात आरोग्य विभागाकडून उपमुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. गोपाळ सिंह यांनी न्यू मेरठ हॉस्पिटलचे प्रबंधक शाह आलम यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. सीओ कोतवाल दिनेश शुक्ला यांनी सांगितले की, सीएमओ किंवा मॅजिस्ट्रेटचे आदेश मिळाले तर हॉस्पिटल सील केले जाईल आणि आरोपींवर कारवाई केली जाईल.