जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी संदर्भात सहकार्य करण्याचे केली विनंती
प्रतिनिधी / शिरोळ
येत्या बारा तारखे रोजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे भाजप पुरस्कृत आघाडीचा करण्यासाठी आपण सहकार्य करावे व पुन्हा भाजपचा झेंडा फडकवा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आपले सहकार्य करावे असे आवाहन माजी खासदार भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी गुरुवारी सकाळी दहा वाजता माजी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेतली यावेळी राजू शेट्टी यांनी याबाबत आपण बघून निर्णय घेऊ असे सांगितल्याचे कळते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या महा विकास आघाडीची सत्ता आहे येत्या बारा तारखे रोजी अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक व शेट्टी यांची बंद खोलीत पाऊन तास चर्चा झाली चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही शेतकरी संघटनेचे जिल्हा परिषदेचे दोन सदस्य आहे. त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी महाडिक प्रयत्न करीत असल्याचे समजते.
या बैठकीस जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलरव नाईक निंबाळकर जि. प. सदस्य दलितमित्र अशोकराव माने जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे स्वाभिमानीचे सावकार मादनाईक बजरंग खामकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.