ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांची दोनदा चाचणी करण्यात आली. त्यात त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. तर नंतरची पॉझिटिव आली आहे. आता त्यांना थोडा श्वसनाचा त्रास होत आहे. बाकी सर्व ठीक आहे.
पुढे ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाला धनंजय मुंडे उपस्थित होते. मात्र या दोन्ही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणामध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोनाची टेस्ट केली जाईल असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.