मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा 30 टक्के अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाचा असर असतानाही देशभरात धनत्रयोदशीदिवशी 20 हजार कोटींचे सोने विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरात यावषी धनत्रयोदशीदिवशी सोन्याची विक्री 40 टन इतकी झाली आहे.
मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ही विक्री 30 टक्के इतकी जास्त असल्याचे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने म्हटले आहे. मागच्या वषी धनत्रयोदशीला 12 हजार कोटी रुपयांचे सोने विक्री झाले होते. त्या तुलनेमध्ये यंदा ते 20 हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या वषीच्या तुलनेत मागच्या वषी 30 टन सोने विक्री झाले होते. कोरोनाच्या काळामध्ये सोन्याच्या दराने 56 हजारचा आकडा पार केला होता. पण त्यानंतर मात्र किमतीमध्ये घट होत गेली. 50 हजाराच्या आसपास सोन्याचे दर आल्याने अनेकांनी ते खरेदी करण्याची संधी साधली. विविध कंपन्यांच्या आणि सराफी व्यावसायिकांच्या ऑफर्समुळे विक्रीत तेजी आल्याचे सांगण्यात येत आहे. 13 नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर 50 हजार 849 प्रति 10 ग्रॅम इतका होता.