वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तुर्कीमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चषक धावण्यांच्या स्पर्धेमध्ये महिलांची 100 मी. धावण्यांची शर्यत भारताच्या एस. धनलक्ष्मीने जिंकताना आपल्याच देशाच्या हिमा दासला मागे टाकले.
महिलांच्या 100 मी. धावण्यांच्या शर्यतीत एस. धनलक्ष्मीने 11.26 सेकंदाचा अवधी नोंदवत प्रथम स्थान मिळविले. भारताच्या हिमा दासला 11.59 सेकंदासह तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या पात्रतेच्या कामगिरीपेक्षा धनलक्ष्मीची कामगिरी सरस झाली आहे. महिलांच्या 200 मी. धावण्यांच्या शर्यतीत धनलक्ष्मीने 23.26 सेकंदासह पहिले तर हिमा दासने 23.51 सेकंदांसह दुसरे स्थान मिळविले. आता चेन्नईत 10 ते 14 जून दरम्यान होणाऱया राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत धनलक्ष्मी आणि हिमा दास सहभागी होत आहेत.