प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील गणेशगुळे येथील धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी गावखडी येथील मुरलीधर भिकाजी तोडणकर या आरोपीला न्यायालयाने 3 महिने सश्रम कारावास व 8 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाळूंजकर यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा
गणेशगुळे येथील सुनील लाड यांनी त्यांचा मित्र मुरलीधर तोडणकर याला जून 2015 मध्ये उसने 4 लाख रूपये दिले होत़े पैसे स्वीकारल्यानंतर मुरलीधर याने पैसे परत करण्यास नकार दिल़ा परंतु अनेकवेळा लाड यांनी तगादा लावल्यानंतर संबंधित रकमेचा धनादेश मुरलीधर यांनी लाड यांना दिल़ा मात्र मुरलीधर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे नसल्याने हा धनादेश बाऊंन्स झाल़ा या प्रकरणी लाड यांनी रत्नागिरी येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केल़ा लाड यांच्या वतीने न्यायालयात ऍड. अभिजित कदम यांनी बाजू मांडल़ी यावेळी न्यायालयाने तोडणकर यांना दोषी मानून 3 महिने सश्रम कारावास व 8 लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी