ऑनलाईन टीम
धनी ऍपने ९० कोटी किंमतीची २५ लाख फ्री कोविड हेल्थ केअर कीटचे वितरण सुरु केले आहे. याचा ५० लाख प्रौढ लोकांना फायदा होईल प्रत्येक कोविड हेल्थ केअर कीट मध्ये २ व्यक्तीसाठी प्रतिबंधात्मकऔषधे आहेत. धनी हा इंडियाबुल्सद्वारे आरोग्यसेवेचा डिजिटल ऍपवर आधारित व्यवसाय आहे.
हे किट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या शिफारसद्वारे तयार केले गेले आहे. आणि कोविड १९ च्या प्रारंभिक प्रतिबंधात्मक काळजीसाठी उपयुक्त ठरेल. किटमध्ये औषधांचा मासिक कोर्स असतो जो ताप किंवा शारीरिक वेदना झाल्यावर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी ३, झिंक आणि पॅरासिटामोलद्वारे प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते.
या उपक्रमाचे लाभ घ्यायला इच्छुक कुटुंबे धनी ऍपवर जाऊन (pharmacy.dhani.com) लॉग इन करा आणि आपले निशुल्क ऑर्डर करा. याशिवाय धनी डॉक्टर आणि तज्ञ यांच्यासह विनामूल्य व्हिडीओ कॉल करू शकतात आणि १५ सेकंदात व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क करू शकतात.
धनी हेल्थ केअरचे अध्यक्ष निखिल चारी म्हणतात कि, “या किटचा वापर रोगप्रतिकार शक्तीला वाढविण्यास होणार आहे. जर एखाद्याला ताप, खोकला, घशाच्या संसर्गासारख्या लक्षणांचा विकास झाला तर त्वरित कोविडची म्हणून या औषधांचा वापर सुरु होऊ शकेल. कुटुंब कोणत्याही मार्गदर्शनासाठी किंवा सल्लामसलतीसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन द्वारे धनी डॉक्टरांबरोबर संपर्क साधू शकतात.
हे कीट वायरल इन्फेक्शन विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल
यासह चीफ मेडिकल ऑफिसर, धनी हेल्थ केअर डॉ. स्मिता दास म्हणल्या कि, असे नाही कि हि किट संपूर्ण कोविड केअर विकल्प आहे, परंतु हि कोविड केअरची सुरुवातीच्या प्रतिबंधात्मक संरक्षणास मदत करेल आणि सर्व वायरल इन्फेक्शन विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल. या उपक्रमाला धनी आपके साथ असे म्हणतात आणि या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी धनी यांनी डॉक्टर्स ऍपवर डॉक्टरांची पॅनेल बनवली आहे जे २४ तास धनी ऍपवर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून योग्य तो मोफत सल्लामसलत करतील.