‘योगासनातील धनुरासन हे संतुलित आणि पूर्ण आसन आहे. या आसनाचे अनेक फायदे होतात.
वजन कमी करण्यासाठी धनुरासन अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर पचनसंस्थेचे कार्य चांगले राहाण्यासाठी धनुरासनाची मदत होते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि शरीराची चयापचय
क्रिया चांगली राखण्यासाठी धनुरासन हा रामबाण उपाय ठरू शकतो.
- सर्व्हायकल, पाठ, कंबरदुखी, सांधेदुखी आणि जठराच्या समस्या बर्
- या करण्यासाठी धनुरासनाची मदत होते.
- धनुरासन केल्याने रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते.
- धनुरासन केल्यामुळे मणका लवचिक होतो शिवाय पाठीचे स्नायू देखील मजबूत होतात.
- तसेच फुफ्फुसेही मजबूत होतात. अस्थमामध्येही धनुरासन फायदेशीर असते.
- हे आसन करण्यासाठी पोटावर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवावे. दोन्ही हात मागे नेत पाय घट्ट पकडावेत. जितके शक्
- य आहे तितके वर उचलावेत.
- दहा ते तीस श्
- वास घेत या आसनात थांबावे. क्षमतेनुसार तीन ते चार वेळा करावे.
- उच्च रक्तदाब, हृदयरोग, हार्निया आदी त्रास तसेच गर्भावस्थेत हे आसन करणे टाळावे.