प्रतिनिधी / शिरोळ
धरणगुत्ती ता.शिरोळ येथील विद्याथ्योने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. मंथन रमेश ठेबुकडे वय १५,रा.नृसिंहप्रसाद हौसींग सोसायटी असे त्याचे नाव असून याबाबतची नोंद शिरोळ पोलीसांत झाली आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीसांनी सांगितले की, मंथन ला दहावीच्या वर्गात शिकत होता. वडीलांचे निधन झाल्यापासून अस्वस्थ होता. घरातील बेडरूमधील सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या मूतयुने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.