हालगा येथे शेअर सर्टिफिकेट वितरण
वार्ताहर / किणये
हालगा येथील धर्मराज मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीच्यावतीने 32 मण सुवर्णसिंहासनासाठी 21 हजार 111 रुपयांची देणगी देण्यात आली. संस्थेच्या शेअर सर्टिफिकेट वितरण प्रसंगी ही मदत निधी देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सदानंद बिळगोजी होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बडेकोळमठाचे मठाधीश नागेंद्र स्वामी उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेच्या संचालक मंडळाच्यावतीने दीप प्रज्वलन करण्यात आले. महालक्ष्मी फोटोपूजन शांतीनाथ नाईक यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन सामाजिक कार्यकर्ते चारुकिर्ती सैबण्णावर यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज फोटो पूजन ऍड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.
अनंत लाड, जिनाप्पा कडेमनी, भुजंग बिळगोजी, यल्लाप्पा सामजी, आदींच्या हस्ते शेअर सर्टिफिकीट वितरण करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत पीडीओ डॉ. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, बीट पोलीस आदी कोरोनायोद्धय़ांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन बाळाराम संताजी, संचालक दयानंद शिंदे, गजानन कोनोजी, यशवंत धामणेकर, मधुकेश बिळगोजी, कृष्णा मोरे, प्रताप संताजी, प्रकाश हेब्बाजी, लक्ष्मी मोरे, माधुरी डुकरे आदींसह सल्लागार अण्णाप्पा मडीवाळ, उमेश डुकरे, सेपेटरी लक्ष्मी संताजी, कर्मचारी संदीप खानगांवकर, भारता चौगुले आदी उपस्थित होते.