धर्मवीर संभाजी चौकात पूजन
प्रतिनिधी /बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने रविवारी सकाळी सांगली येथून धर्मवीर ज्वाला बेळगावमध्ये आणली. धर्मवीर संभाजी चौकात ज्वाला आणल्यानंतर तिचे पूजन करण्यात आले. जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते संभाजी ज्वालेचे पूजन करण्यात आले.
शनिवारी सकाळी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते ज्वाला आणण्यासाठी सांगलीला रवाना झाले होते. रविवारी सकाळी ज्वाला धर्मवीर संभाजी चौकात आणल्यानंतर विधिवत पूजन झाले. तेथून हातात भगवा ध्वज व ज्वाला घेऊन धारकरी ताशिलदार गल्ली येथे पोहोचले. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. धर्मवीर ज्वाला दर्शनासाठी ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे ठेवण्यात आली आहे. ज्वालेचे स्वागत करण्यासाठी मोठय़ा संख्येने धारकरी उपस्थित होते.
गुरुवार दि. 31 रोजी ‘धर्मवीर ज्वाला’ गावोगावी नेण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी 4 वा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथून ज्वाला गावोगावी नेण्यात येणार आहे.