प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात धर्मांतर करण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. खास करून हिंदू धर्मांतील लोकांना गाठून त्यांच्या मनात धर्मांतराचे बिज पेरले जाते व धर्मांतर केले जाते. हे धर्मांतराचे लोण आत्ता दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळा पर्यंत पोचले आहे. याचा प्रत्यय मडगावातील एका वकिलाला आला आहे.
वकिलाकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे,दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दोन महिला बायबल घेऊन फिरतात व लोकांना गाठून त्यांना येशू ख्रिस्ताबद्दलची माहिती देण्यास प्रारंभ करतात. येशू ख्रिस्त आत्मसात केल्यास सर्व संकटे दूर होतील, सर्व समस्यांचे निवारण होईल, आजारी व्यक्ती बऱया होतील असे सांगून येशू ख्रिस्त आत्मसात करा असे सांगतात. त्याच बरोबर येशू ख्रिस्ताची माहिती देणाऱया पत्रिका देतात.
दक्षिण गोव्याच्या नव्या जिल्हा इस्पितळात चाललेला हा प्रकार कितपत योग्य असा सवाल ही त्या वकिलाने उपस्थित केला आहे. इस्पितळाचे सुरक्षा रक्षक असे प्रकार खपवून घेत असल्याबद्दल वकिलाने आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व सामान्य व अडचणीत असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे धर्मांतराच्या जाळय़ात ओढण्याचा हा प्रकार असल्याचे मत ही वकिलाने व्यक्त केले आहे.
मडगावच्या वकिलाच्या जवळच्या नातेवाईकाला आजारी असल्याने नव्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आले. त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या वकिलाला या प्रसंगाल सामोरे जावे लागले. येथील सुरक्षा यंत्रणा तसेच इस्पितळाचे वरिष्ठ अधिकारी किती गाफील असतात हे या घटणेतून स्पष्ट झाल्याचे मत वकिलाने मांडले.