पंतप्रधान मोदी यांचे एससीओ बैठकीत प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
धर्मांधता, तसेच मूलतत्ववाद या दोन समस्या आजही प्रमुख आहेत, हे अफगाणिस्तानातील घटनांवरुन सिद्ध होत आहे. विश्व समुदायाने या संबंधी सामायिक आणि एकात्म भूमिका घेणे आवश्यक असून या समस्यांना तोंड देण्यासाठी एकमेकांमध्ये सहकार्य असण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसीओ बैठकीत शुक्रवारी केले.
ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. या बैठकीत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनीही अफगाणिस्तानासंबंधी एकात्म भूमिका घेतली पाहिजे असे प्रतिपादन केले. अफगाणिस्तानातील घटनांचा भारतासारख्या देशांवर सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
अफगाणिस्तानात अस्थिरता आणि मूलतत्ववाद वाढीस लागला तर दहशतवादाला प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच यामुळे जगभर अतिरेकी विचारसरणीला पाठबळ मिळेल. यग्नाचा परिणाम जगाची शांतता बिघडण्यात होईल. इतर देशांमध्येही धर्मांध शक्ती सरकारे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील. अफगाणिस्तानातील सरकार सर्वसमावेशक नाही. तसेच ते कोणत्याही प्रकारच्या चर्चेशिवाय आणि वाटाघाटींशिवाय स्थापन झाले आहे. आता अफगाणिस्तानात मानवतेच्या पायमल्लीचे गंभीर संकट निर्माण झाले असून या देशाची अर्थव्यवस्था ढासळण्याचा संभव आहे, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
शस्त्रांचा दुरुपयोग शक्य
मोठय़ा प्रमाणात आधुनिक शस्त्रास्त्रे अफगाणिस्तानाच सोडण्यात आली आहेत. त्यांचा दुरुपयोग होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रातच तीव्र अस्थिरता निर्माण होऊ शकते, या धोक्याची जाणीवही त्यांनी करुन दिली. हे धोके टाळायचे असतील तर विश्व समुदायाने एकत्रित होऊन समान धोरण ठरविण्यग्नाची आवश्यकता आहे, असा विचारही त्यांनी या भाषणात व्यक्त केला.
सरकार समावेशक नाही
तालीबानचे सरकार अंतरिम असून ते सर्वसमावेशक नाही, हे स्पष्ट आहे. तरीही या सरकारबरोबर कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा व्यवहार करावा लागणार आहे, असेही दिसून येते. मात्र, कोणतेही धोरण ठरविग्नताना ते सर्व देशांनी एकत्रिरित्या ठरविणे आवश्यक आहे. या सरकारशी संवाद ठेवावा लागणार आहे. चीन, पाकिस्तान, रशिया आणि अमेरिका यांच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. रशिया आणि चीनने तेथे आपले दूतावास अद्यापही खुले ठेवले आहेत, ही बाब पुतीन यांनी अधोरेखित केली. पूर्वीचे मॉस्को सूत्र यासाठी उपयोगी पडेल. सीएसओ आणि सीएसटीओ संस्थांनी याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अमेरिकेची पाकिस्तानला तंबी
अफगाणिस्तान सरकार अपेक्षेप्रमाणे स्थापन झालेले नाही. या सरकारची ध्येयधोरणे स्पष्ट होत नाहीत, तो पर्यंत त्याला मान्यता देण्याची घाई करण्यग्नात अर्थ नाही. पाकिस्ताननेही या सरकारला त्वरेने मान्यता देण्याची चूक करु नये. अन्यथा पाकिस्तानशी असलेल्या अमेरिकेच्या संबंधांचा पुनर्विचार करावा लागेल, असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तान सरकारला जगाने लवकर मान्यता द्यग्नावी, असे आवाहन केले होते, तथापि अमेरिकेने थांबा आणि वाट पहा हेच धोरण अवलंबिले आहे.
जगाची भूमिका सावध
ड अफगाणिस्तान सरकारविषयी जगभरात संशयग्नाचेच वातावरण
ड बलाढय़ देशांची थांबा आणि वाट पहा हीच भूमिका राहणार
ड अफगाणिस्तान सरकारला मान्यता मिळण्यग्नाची पाकिस्तानला घाई