कारलगा येथील चव्हाटा मंदिर उद्घाटनप्रसंगी उद्योजक नासिर बागवान यांचे प्रतिपादन
वार्ताहर /चापगाव
खानापूर तालुक्यात अनेक पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक गावातील मंदिरांचा विकास झाला पाहिजे यासाठी गावागावात आपण मदतीचा हात उभे करून सहकार्य केले आहे. प्रत्येक खेडय़ापाडय़ातील लोकांनी यासाठी केलेले प्रयत्न हे एकीचे प्रतीक आहे. कारलगा येथील चव्हाटा मंदिराचे दहा वर्षांपासून जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले होते. त्याची पूर्ततः झाली याचा आनंद होत आहे. धर्म, रितीरिवाज या गोष्टी जतन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राणी शुगरचे चेअरमन व उद्योजक नासिर बागवान यांनी कारलगा येथील श्री चव्हाटा मंदिर उद्घाटनप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी निवृत शिक्षक गोविंद कुटे होते.
स्वागत शेखर पाटील यांनी केले. मंदिर व गावच्या इतिहासाचा आढावा मांडला. मंदिराचे उद्घाटन उद्योजक नासिर बागवान माजी जि. पं. सदस्य ज्योतिबा रेमानी, उद्योजक किसन बेळगावकर यांनी केले. गाभारा उद्घाटन आमदार डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार दिगंबर पाटील, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील आदींच्या हस्ते झाले.
दीपप्रज्वलन आमदार डॉ. अंजली निंबाळकर, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी केले. कार्यक्रमात ग्रामपंचायत उपाध्यक्ष मारुती चोपडे उद्योजक लक्ष्मण पवार, निवृत्त शिक्षक वामन पाटील, अनंत पाटील, प्रभाकर जाधव, परसराम घाडी, उद्योजक नागराज येळ्ळूरकर, उद्योजक रवी बर्डे, राजू सिद्धानी, भरमानी पाटील, लैला शुगरचे एमडी सदानंद पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, मारुती पाटील, रमेश धबाले, वासुदेव नांदुरकर, राजाराम पाटील, वैष्णवी काद्रोळकर, पुष्पा आळवणी, अंकिता सुतार आदींनी विविध दैवतांचे पूजन केले. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन पंडित ओगले व उद्योजक मुकुंद पाटील यांनी केले.
यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर म्हणाल्या तालुक्मयाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. व्यासपीठावर उद्योजक नामदेव शिवणेकर, संतोष पाटील, संजय हलगेकर, भैरू पाटील, प्रसन्न कुलकर्णी पिराजी कुऱहाडे, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. स्वागताध्यक्ष रणजीत पाटील, अरुण काद्रोळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष जाधव, प्रशांत आळवणी यांनी केले. यावेळी देणगीदारांचा सत्कार केला.