चारजणांना अटक : लुटलेली रक्कम हस्तगत
विजापूर / वार्ताहर
चार दिवसापूर्वी म्हणजे दि. 19 रोजी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर विजापूर-हलसंगी क्रॉसनजिकच्या सागर धाब्याजवळ एका युवकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील पावणेतीन लाख रुपये लुटले. सलमान पाशा बानू अहमद बटाणी (वय 26) असे या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
शेळय़ांचा व्यापार करण्यासाठी म्हैसूर जिह्यात तो कंटेनरमधून जात होता. जेवणासाठी कंटेनर थांबला होता. यावेळी अजीत राठोड हा मोटारसायकलवरून आला व त्याने सलमान पाशाला आमच्याकडे शेळय़ा आहेत. त्या घेता का, असे विचारले व त्याला मोटारसायकलवरून नेले. भीमाशंकर साखर कारखान्याजवळ आल्यावर शेळय़ा चरत असल्याचे दाखविले, तेवढय़ात तीन जण दुसऱया मोटारसायकलवरून आले व त्यांनी सलमान पाशाला चाकूचा धाक दाखवून जिवे मारल्याची धमकी दिली व त्याच्या खिशात असलेले 2,75,000 रुपये काढून घेऊन सर्व जण मोटारसयकलवरून फरार झाले. याबाबत सलमान पाशा याने झळकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपास करत आहेत.
चौघांना अटक
खबऱयाच्या मदतीने पोलिसानी रविवारी धुळखेड नजिकक असलेल्या चनेगाव गावातील एका शेतातील शेडमध्ये अजीत रंगू राठोड (वय 19), सचीन अशोक चव्हाण (वय 19), सिद्दू तुकाराम चव्हाण (वय 20), उमेश सिद्दू.राठोड (वय 19), या चौघाजणांना ताब्यात घेतले व चौकशीसाठी चडचण पोलीस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान सर्व आरोपीनी गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडील लुटलेले पैसे व गुन्हय़ासाठी वापरलेल्या मोटारसापाल जप्त केल्या.