प्रतिनिधी / फोंडा
दोन किलो तांदूळ व पावकिलो डाळ मिळवण्यासाठी परप्रांतीय मजूरांची रविवारी दुपारी बेतोडा येथील सनग्रेस गार्डनजवळ एकच झुंबड उडाली. मोठय़ा संख्येने मजूर जमल्याने सामाजिक अंतराचा भंग झाल्याने स्थानिकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळीत सुरक्षित अंतर राखून मजूरांना धान्याचे वितरण करण्यात आले.
रविवारी दुपारी बेतोडा येथे घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय बनला असून काही सामाजिक कार्यकर्त्यानी या प्रकाराबद्दल तीव्र आक्षेप घेतला. नागरी पुरवठा खात्यातर्फे मजूरांसाठी सनग्रेस गार्डनजवळ धान्य वितरणाची सोय करण्यात आली होती. बेतोडा भागात मोठय़ा संख्येने वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजूराना ही गोष्ट कळताच धान्य मिळवण्यासाठी त्यांनी एकच गर्दी केली. मोठय़ा संख्येने मजूर एकत्र आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला. स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने फोंडय़ातील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याबद्दल हरकत घेत सरकारी यंत्रणांना पाचारण केले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सर्व मजूरांना एका रांगेत सुरक्षित अंतरावर उभे करून धान्य वितरीत करण्यात आले. तोपर्यंत समाज माध्यमावर या घटनेच्sााr छायाचित्रे व व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर फोंडा परिसरात हा चर्चेचा विषय बनला होता.