तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
धान्य घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नगरसेवक प्रशांत कथले आणि राकेश किलचे या दोन आडत व्यापाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की पनवेल येथील राज्यव्यापी तांदूळ घोटाळा प्रकरणात बार्शीतील भीमाशंकर खाडे या आडत व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बार्शी आणि वैराग पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये वैराग येथील सतीश खेदांड याच्या आडत दुकानातून २५७ पोते तांदूळ आणि ९४ पोते गहू असे एकूण सुमारे दोन लाख साठ हजार रुपयांचे रेशनचे धान्य पोलिसांनी जप्त केले आहे. अशा धान्य घोटाळा प्रकरणी पोलिस तपासात बार्शीतील प्रशांत कथले, राकेश किलचे या आडत व्यापाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. वरील दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. तसेच उपळाई ठोंगे येथील रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना पकडण्यात आले आहे. यामध्ये संतोष गोडसे, शिवाजी पांगरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.