वार्ताहर/ धामणे
श्रावण मासाचे औचित्य साधून येथील बसवाण्णा मंदिर जीर्णोद्धार कमिटीतर्फे सोमवार दि. 3 रोजी बसवाण्णा देवाला अभिषेक घालण्यात आला.
बसवाण्णा मंदिर जीर्णोद्धार कमिटीतर्फे श्रावण सोमवारनिमित्त सोमवारी सकाळी सहा वाजता अभिषेक घालण्यात येऊन आरती करण्यात आली. याप्रसंगी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य बसवंत बाळेकुंद्री, किरण चतूर, रामा बाळेकुंद्री, एम. के. पाटील, वसंत बाळेकुंद्री, पिंटू मादाकाचे, बाळू केरवाडकर, लक्ष्मण रेमाण्णाचे, शिवाजी बाळेकुंद्री, परशराम रेमाण्णाचे, सावंत येळ्ळूरकर, नंदू सायनेकर, त्याचप्रमाणे नागराज मादाकाचे, विकी केरवाडकर, यल्लाप्पा डुकरे, तातोबा चौगोंड आणि नागरिक व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. सोमवार दि. 10 रोजी सकाळी सहा वाजता येथील श्री शिवशक्ती युवक मंडळतर्फे बसवाण्णा देवाला अभिषेकचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे..