वार्ताहर/ धामणे
येथे सुरू असलेल्या रौप्यमहोत्सवी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, प्रवचन व रात्री 8 ते 10 कीर्तन असे कार्यक्रम होत आहेत. दररोज कीर्तन सेवेसाठी पंचक्रोशीतील शेकडो माळकरी आणि भाविक मोठय़ा संख्येने अपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेत आहेत. शुक्रवार दि. 4 रोजी हभप पूर्णानंद काजवे महाराज यांची कीर्तन सेवा झाली. शनिवार आणि रविवारी रात्री 8 ते 10 हभप सुनील माने महाराज मु. तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी सकाळी 8 ते 9 हभप मारुती महाराज सांबरेकर, धामणे यांचे कालाकीर्तन होऊन रिंगणसाठी उपस्थित असलेल्या अश्वाच्या उपस्थितीत पालखी दिंडी होऊन उभा रिंगण व गोल रिंगण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. उभा रिंगण सोहळा सोमवारी सकाळी 10 वाजता आणि गोल रिंगण दुपारी 12 वाजता होणार आहे. आळंदी ते पंढरपूर दिंडीतील माऊलीच्या अश्वाच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा होणार असून दुपारी 2 ते 4 महाप्रसादाचे वाटप होऊन पारायण सोहळय़ाची सांगता होणार आहे..