वार्ताहर / धामणे
येथे प्रतिवर्षाप्रमाणे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 16 ते गुरुवार दि. 18 फेब्रुवारी असे तीन दिवस येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात सामुदायिक पारायण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायणाचेअधिष्ठान हभप मारुती सांबरेकर महाराज सांभाळणार आहेत. रविवार दि. 7 रोजी हभप मारुती सांबरेकर महाराज यांच्या सानिध्यात हभप हुवान्ना शिवाण्णाचे यांच्या हस्ते मुहूर्तमेढचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी हभप यल्लाप्पा भोसले, मोनाप्पा व्हन्नुले, दशरथ चौगुले, जयपाल व्हन्नुले, यल्लाप्पा काकतकर, जोतिबा दौलतकर आदी वारकरी उपस्थित होते.
पारायण सोहळय़ाची दिंडी सोमवार दि. 15 रोजी दुपारी 3 वाजता गावात काढण्यात येणार आहे. या दिंडीचे उद्घाटन परशराम बेन्नाळकर यांच्या हस्ते होणार आहे. मंडप उद्घाटन दि. 15 रोजी रात्री 9 वाजता उमेश पाटील यांच्या हस्ते होणार असून मंगळवार दि. 16 रोजी पहाटे 4 वाजता काकड आरतीने पारायणाची सुरुवात होणार आहे. दि. 16 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत हभप यल्लाप्पा गिरमल महाराज (सांबरा) यांचे कीर्तन तर दि. 17 रोजी रात्री 9 ते 11 हभप विठ्ठल पाटील महाराज मु. पो. नागोचे, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर यांचे कीर्तन होणार आहे.
पारायणाचा दैनंदिन कार्यक्रम
रोज पहाटे 4 ते 6 काकडारती, सकाळी 6 ते 8 श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, सकाळी 8 ते 8.30 ध्वजवंदन, 8.30 ते 10 पुन्हा ग्रंथ वाचन, सकाळी 10 ते 12 विश्रांती, दुपारी 12 ते 3 महिला भजन, दुपारी 3 ते 5 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन व रामजप, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 जागर भजन.
18 रोजी महाप्रसाद
दि. 18 रोजी पहाटे काकड आरती व विविध पूजन होऊन सकाळी 9 ते 11 हभप सदानंद कदम महाराज (हिंडलगा) यांचे कालाकीर्तन होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर दुपारी 1 ते 4 यावेळेत महाप्रसादाने पारायणाची सांगता होणार आहे.