प्रतिनिधी/ सातारा
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत सातारा जिह्यातील धामणेर (ता. कोरेगांव) या ग्रामपंचायतीस सन 2018-19 मधील ‘जिल्हा सुंदर गांव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर सन 2019-20 मधील ‘तालुका सुंदर गाव’ म्हणून अपशिंगे (मि.) ता. सातारा, शिरंबे (ता. कोरेगांव), नागनाथवाडी (ता. खटाव), गोंदवले खुर्द (ता.माण), काळज (ता.फलटण), गुठाळवाडी (ता.खंडाळा), चांदवडी पुनर्वसन (ता.वाई), चोरांबे (ता.जावली), मांघर (ता.महाबळेश्वर), गमेवाडी (ता.कराड) व मान्याचीवाडी (ता. पाटण) या 11 ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रा.पं.) अविनाश फडतरे यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण गुरुवार दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही श्री. फडतरे यांनी दिली.